स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलि.) शंभर टक्के अलॉटमेंटसह पुन्हा महाराष्ट्रात अव्वल ! तंत्रशिक्षणातील सर्वोच्च मानांकन एन.बी.ए. ला पालकांची जास्त पसंती - लोकराजा

Breaking News

Adsense ad

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलि.) शंभर टक्के अलॉटमेंटसह पुन्हा महाराष्ट्रात अव्वल ! तंत्रशिक्षणातील सर्वोच्च मानांकन एन.बी.ए. ला पालकांची जास्त पसंती

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलि.) शंभर टक्के अलॉटमेंटसह पुन्हा महाराष्ट्रात अव्वल !

तंत्रशिक्षणातील सर्वोच्च मानांकन एन.बी.ए. ला पालकांची जास्त पसंती

Sveri's College of Engineering (Poly.) Again tops Maharashtra with 100% allotment! The highest ranking in technical education is NBA. More preferred by parents

पंढरपूर - शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालय शंभर टक्के अलॉटमेंटसह पुन्हा राज्यात अव्वल ठरले आहे. डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेला अद्याप सुरवात व्हायची आहे त्या पार्श्वभूमीवर डिप्लोमाची शंभर टक्के अलॉटमेंट झाली आहे ही बाब भूषणावह आहे. त्यामुळे आता डिग्री इंजिनिअरींग प्रवेशाला देखील प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याचे दिसून येत आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

          स्वेरीतील एन. बी.ए. मानांकित अभियांत्रिकी कोर्सेस असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्वेरी इंजिनिअरिंगची राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष प्रवेश सन २०२१-२२ करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिली होती. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम व थेट व्दितीय वर्ष इंजिनिअरींग (पॉलि.) प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले होते. उच्च शिक्षित व अभ्यासू प्राध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करून भावी अभियंत्यांना योग्य दिशा दिली. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे यंदाचे हे चौदावे वर्ष आहे. गेली सलग चार वर्ष शंभर टक्के ऍडमिशन पुर्ण होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी डिप्लोमा महाविद्यालय आहे. उज्वल यशाची पंरपंरा यंदा देखील महाविद्यालयाने कायम राखत शंभर टक्के अलॉटमेंट पूर्ण केलेली  आहे. स्वेरीतील डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विविध ब्रँचेस साठीचे सर्वाधिक मेरिट ९८ टक्क्यांच्या आसपास आहे तर सरासरी कट ऑफ ८५ टक्के च्या दरम्यान आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामुळे स्वेरी डिप्लोमाला प्रवेश मिळू शकला नाही. या कॉलेजला महाराष्ट्र व गोवा राज्य शासनाकडून ‘बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्ड' नेही या अगोदरच सन्मानित केले गेले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांचे विशेष मार्गदर्शन, उज्वल निकालाची परंपरा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे एनबीए मानांकन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन, उत्कृष्ट प्लेसमेंट, गरीब व होतकरू मुलांसाठी 'कमवा व शिका' योजना, रात्र अभ्यासिकेची सोय, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या सर्वागीण विकास प्रक्रियेत कायम कार्यतत्पर असणारा तज्ञ शिक्षक वर्ग व डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांचे उत्तम नेतृत्व या सर्व गोष्टींचे फलित म्हणजे प्रवेश प्रक्रियेत स्वेरी कॉलेजला मिळालेला विद्यार्थी व पालक यांचा अदभूत प्रतिसाद होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads